पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील वरळीत आज भल्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे.एका भरघाव कारने वरळी येथील अॅट्रीया माॅल जवळ वरळी कोळीवाडा भागात राहणारे दांपत्य हे दुचाकीवरून ससून डॉक येथील मच्छी मार्केट येथून मच्छी घेऊन दुचाकीवरुन जात असताना.दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दोघेजण कारच्या बोनेटवर पडले यात दुचाकीस्वार यांने उडी मारुन स्वताचा बचाव केला.परंतू त्यांची पत्नीला कार चालकाने फरफटत नेल्यांने या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली की.या अपघातात दुचाकीचा अपघात झाला त्यावेळी कार चालकांने बोनटवर पडलेल्या महिलेला कार न थांबवता तसेच फरफटत नेल्यानंतर ती गंभीर रित्या जखमी झाली .कार चालक कार न थांबवता घटनास्थळावरून फरार झाला आहे.अपघाता नंतर सदर महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सदर अपघात प्रकरणी वरळी पोलिसांनी 👮 कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास वरळी पोलिस करत आहेत. दरम्यान सध्या महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.या वाढलेल्या घटनां मुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रोडवरुन जावे लागत आहे.