पुणे दिनांक ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ओडिसा येथील प्रसिद्ध असलेल्या पुरी येथे भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची माहिती विश्र्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.यात्रे दरम्यान यात भाविकांच्या चेंगराचेंगरी एकूण ४०० पेक्षा जास्त भावीक हे जखमी झाले आहेत.दरम्यान मंदिर प्रशासन व पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णवाहिका मधून उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.तर या चेंगराचेंगरी एक भाविकाचा श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान पोलिस या मृतकाची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.दरम्यान यात्रेत भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथ ओढण्याच्या वेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.सदरची यात्रा ही पुरी येथे सन १९७१ पासून ही यात्रा सुरू असून यात लाखो भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात व या रथयात्रेत नंदी घोष रथ ओढण्याची परंपरा आहे.असे मंदिर प्रशासना घ्या वतीने सांगण्यात आले आहे.