पुणे दिनांक ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेबाहेर आमदार बच्चू कडू यांनी यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की ” शेतकरी म्हणून विधानसभेत आले पाहिजे . आमदार हे पक्षाचे होतात ते शेतकऱ्यांचे होत नाहीत.शेतक-यांच्या प्रश्नावरुन सदन मध्ये १० ते १२ आमदारांचा गट नेहमी आक्रमक झाला तर शेतकरी वर्गाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.महायुतीत नाखूशचा विषय नाही.आम्ही मुद्द्यावरच लढू.व सर्व प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटू.जर यात काही सकारात्मक चर्चा झाली नाही.तर मग मी १५ ते २० आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत लढणार.असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.