पुणे दिनांक १३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई ते आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार व आयशर ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कार मधील चार जणांचा मृत्यू झाला आहे.तर आयशर ट्रक मधील चालक व क्लिनर दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून माहिती देण्यात आली की कार मधील अपघातात घटनास्थळी ठार झालेल्या चार जणांची नावे १) रहेमान सुलेमान तांबोळी (वय ४८ ) २)अरबज चांदुभाई तांबोळी ( वय २१ दोघे रा.लेखानगर) ३) सीज्जू पठाण (वय ३८ रा. इंदिरा नगर) ४)अक्षय जाधव (वय २४ रा.श्रध्दा विहार इंदिरा नगर) या प्रमाणे आहेत.या चार जणांचे मृतदेह हे पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आयशर ट्रक हा भरघाव वेगाने जात असताना ट्रकचा टायर फुटल्याने तो असंतुलित होत विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जोरात आदळल्या नंतर भीषण अपघात झाला आहे.यात कारचा चक्काचूर झाला आहे.तर आयशर ट्रकच्या कॅबिनचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन ट्रकचा किल्नर व चालक हे दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील मृत व्यक्ती यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून ते सटाणा येथे जात असताना हा अपघात होऊन यात त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.