पुणे दिनांक २० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजांचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत उपोषण सुरु केले आहे.मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण मिळावे म्हणून आजपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे.राज्य सरकारला त्यांनी दिनांक १३ जुलै पर्यंत सगेसोयरेची अधिसूचना जारी करावी अशी मागणी केली होती.दरम्यान या त्यांच्या मागणीची राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.म्हणून आज पासून त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान यापूर्वी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण हे ओबीसी मधूनच द्यावे.व सगेसोयरेची अधिसूचना जारी करावी. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांंचा शिक्षणांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती.दरम्यान आज पासून सुरू होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने जमन्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडण्याची शक्यता आहे.