Home Breaking News वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूरशी संपर्क तुटला

वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूरशी संपर्क तुटला

112
0

पुणे दिनांक २१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत आहे.सांगलीत असणाऱ्या वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून शिरोळ्याचा ऐतवडे खुर्द पुल हा पाणी खाली गेला आहे.पुलावर पाणी आल्याने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.त्यामुळे शिरोळा व कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.तसेच शिरोळा तालुक्यात गेल्या ४ ते ५ दिवसां पासून पावसाची संततधार सुरू आहे.तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात देखील अतिवृष्टी सुरू आहे. सततच्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे.कालपासून वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने एकूण ११ ते १२ बंधारे हे पाण्याखाली गेली आहेत.दरम्यान वारणा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleपुढील ४ तासात अतिमुसाळधार पाऊस हवामान खात्याच्या अंदाज,सतर्क रहा -मुख्यमंत्री
Next articleमहाराष्ट्रात उद्याही मुसाळधार पाऊस कोसळणार, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व कॉलेजला सुट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here