पुणे दिनांक २१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.याच पार्श्वभूमीवर उद्या २२ जुलै सोमवार रोजी कोकणात व विदर्भात तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्र चंद्रपूर व भंडारा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.तसेच रायगड.रत्नागिरी.सातारा.जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसाळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू असून रस्ते आणि सखल भागात पाणी साचले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.दरम्यान याचवेळी हवामान विभागाच्या वतीने भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभजकर यांनी उद्या सोमवारी दिनांक २२ जुलै रोजी शाळा व कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.व तसेच नागरिकांना सतर्क रहाण्याचा आवाहन करण्यात आले आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूरपरिस्थिती पाहता उद्या सोमवारी दिनांक २२ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेजला व अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली आहे. असे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.