पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास मुसाळधार पाऊस कोसळत होता.या पावसामुळे अनेक सखोल भागात पाणी साचले होते.या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या दोन तालुक्याचा संपर्क तुटला आहे.तर पवनीतील आसगावला पुराने वेढा घातला आहे.त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळित झाले आहे.नागरिकांना 🏠 घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.तसेच आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे.तसेच भंडारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे तर घरात पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.तर शाळा व कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.