पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिनांक २३ जुलै मंगळवारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.उध्दव ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.उध्दव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाचे १६ आमदार अपात्रता ठरवण्याची याचिका दाखल केली तर अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाचे वतीने करण्यात आली आहे.दरम्यान या सुनावणी प्रकरणावर शिवसेना आमदार व राष्ट्रवादी आमदार यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे आज लक्ष लागले आहे. दरम्यान तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे.तोप्रर्यत दोन्ही पक्षांना त्यांचे पक्ष चिन्ह मिळणार का ? यावर देखील अनेक जणांचे लक्ष लागले आहे.