Home Breaking News उपोषणकर्ते खासदार निलेश लंकेची तब्येत बिघडली

उपोषणकर्ते खासदार निलेश लंकेची तब्येत बिघडली

112
0

पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर येथील पोलिस अधिक्षक कार्यालया बाहेर उपोषणाला बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची तब्येत बिघडली आहे.मागील दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनातील भ्रष्टाचार विरोधात निलेश लंके हे उपोषणाला बसले आहेत.उपोषणा दरम्यान लंके यांचा ब्लडप्रेशर वाढला आहे.तसेच रक्ता मधील साखरेची पातळी देखील वाढलेली आहे. दरम्यान अहमदनगर पोलिस मुख्यालयातील पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली आणि अहमदनगर शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,अशी ठाम भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे.

Previous articleअर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ११ वाजता अर्थसंकल्प मांडणार
Next article‘लाडकी बहीण योजनेसाठी ‘ आजच्या कॅबिनेटमध्ये सहा बदल , विवाहित महिलांना दिलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here