पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी कॅबिनेटची म्हत्वाची बैठक झाली पार पडली आहे.सदरच्या बैठकीत एकूण सहा म्हत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, यात प्रामुख्याने आशा स्वंयसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्या चार निर्णय घेण्यात आला आहे.यात ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास १० लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे.
दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सादरीकरण करण्यात आले आहे.यावेळी राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सार्वाधिक महिलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यात येणार आहे.तसेच सदरची योजना जलदगतीने पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्ती मध्ये बदल करून त्यात शिथिलता करण्यात आली आहे.या साठी आजच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत नवीन सहा नियम व अटी व शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे.या करीता लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येणार आहे.दरम्यान यात विवाहित महिलेची विवाहित नोंदणी लग्यच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.तसेच ग्रामस्तरावर समिच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखविण्यात येणार आहे.तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट व बॅक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे.व एखाद्या महिलाचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या देखील महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे.तसेच केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात यावे.व तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात यावा.तसेच ओटीपीचा कालावधी दहा मिनिटाचा करण्यात यावा.दरम्यान लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.तसेच १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनाचा थेट लाभ म्हणून एकूण दोन महिन्यांची रक्कम ३००० रुपये बॅक खात्यात जमा होणार आहे.तसेच राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू ठेवणार. व मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात मिळणार. शेतपिंकाचे नुकसान ठरविण्यासाठी अद्यायावत प्रणाली व दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण.तसेच अंबड तालुक्यात एमआयडीसी साठी १६ हेक्टर जमीन , आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत हे म्हत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.