Home Breaking News खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग भिडे पुलाला लागले पाणी, डेक्कन नदीपात्रातील रस्ता झाला...

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग भिडे पुलाला लागले पाणी, डेक्कन नदीपात्रातील रस्ता झाला बंद

210
0

पुणे दिनांक २४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.मुठा नदीत पाणी आल्याने डेक्कन नदीपात्रातील रस्ता प्रशासनाच्या वतीने बंद केला आहे.दरम्यान पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासल्याच्या धरणातून मोठ्या प्रमाणावर आजपासून ९ हजार ४१६ क्युसेकने मुठाच्या नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे मुठा नदी ओसंडून वाहत आहे.

दरम्यान यामुळे मुळे नदीला पाणी आल्याने बाबा भिडे पुलाला पाणी लागले आहे.त्यामुळे नदीपात्रातील रस्ता हा वाहतुकीसाठी बंद केला आहे.दरम्यान भीडे पुला वरील रस्ता हा वाहतुकीसाठी पुणे पोलिसांनी 👮 बंद केला आहे.तसेच नदी पात्रात बॅरीकेंटीग लावून नदी पात्रातील रस्ता बंद करण्यात आला आहे.

Previous articleनेपाळच्या काठमांडूत टेकऑप करताना विमान दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू
Next article…तर त्यांना सोडत नाही – देवेंद्र फडणवीस,एसपींचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here