पुणे दिनांक २४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील जंगली महाराज रोडवरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.दरम्यान पुण्यातील मुसळधार पाऊस व खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्याने भिडे पूल बंद करण्यात आला आहे.तसेच नदी पात्रातील रोडवर पोलिसांनी 👮 बॅरीकेंटीग केले आहे , व रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने अन्य रस्त्यावर वाहतुकीची ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळेच डेक्कनच्या जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.दरम्यान आज बुधवारी सकाळपासूनच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे.तसेच लोणावळा येथे देखील आज ☁️ ढगफुटी झाली आहे.तसेच पुणे येथील खडकवासला धरण हे १०० टक्के भरले असून या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.व त्यांचे पाणी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात सोडले आहे.तसेच पुण्यातील प्रशासनाला याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच नदी पात्राच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना देखील या बाबत माहिती देण्यात आली आहे.