पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आता पावसाचा जोर ओसरला असून शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.मात्र अनेक भागात चिखल झाला आहे.नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तर काही ठिकाणी साप 🐍 व 🦂 विंचू निघत आहे.मागील दोन दिवस पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला होता.त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते.अजून देखील पुणे महापालिकेचे अधिकारी व लष्कर व एनडीआरएफचे जवानाचे पथक येथे तैनात आहे.दरम्यान आज पुणे शहर व पिंपरी -चिंचवड व पुणे जिल्ह्यातील शाळा व कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.तसेच पुण्यात पावसामुळे एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पुण्यात पावसाचा जोर ओसरल्याने आता पुणे शहरातील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.त्यातच आता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.आताच्या परिस्थिती मध्ये फक्त सध्या फक्त १३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे.यापूर्वी ३१ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.दरम्यान खडकवासला धरण क्षेत्रात देखील पाऊस आता थांबला आहे.त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.एकंदरीत काय तर पुण्यातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत आहे.तरी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.