पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली व कोल्हापूर याभागात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे.सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत एकूण ८० खतरनाक कैदी यांना कोल्हापूर येथील कळंबा जेल मध्ये हलवले गेले आहे.सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.यात एकूण ६० पुरुष कैदी तर २० महिला कैदी यांचा समावेश आहे.
दरम्यान सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.तसेच कोयना धरणातून कृष्णानदीच्या पात्रात पाणी सोडले जात असल्याने कृष्णा नदी ही दुथडी भरून वाहत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अजून आणखी काही कैद्यांना हलवले जाणार आहे.अशी माहिती मिळत आहे.याच बरोबर कारागृहातील अन्य धान्य कागदपत्रे.शास्त्रात्रे व दारुगोळा सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे. अशी माहिती कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे.