पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) झारखंड राज्यांचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज त्यांच्या जामीनाला आव्हान देणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.तसेच सोरेन यांना यापूर्वी मिळालेला त्याचा जामीन कायम ठेवला आहे.सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे आता ईडीला एक प्रकारे चांगलाच झटका बसला आहे.दरम्यान या प्रकरणी न्यायमूर्ती बी.आर.गवई व न्यायमूर्ती के.व्ही.विश्र्वनाथन यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेतली.दरम्यान याआधी झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांचा जामीन कायम ठेवला होता.त्यामुळे झारखंड हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध ईडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.मनी लाॅंड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन जामीनावर सध्या बाहेर आहेत.