पुणे दिनांक ३० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षणावर उध्दव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा बांधव हे मातोश्री वर भेट घेण्यासाठी गेले होते, परंतु उध्दव ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नाही.त्यामुळे मराठा समाजाचे पदाधिकारी हे आज चांगलेच आक्रमक झाले आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता मातोश्री निवास स्थानावर मराठा संघटनांनी धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत हीच बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या वतीने आज मातोश्री निवासस्थानी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान आज उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना भेट न दिल्यास मराठा समाज हा मातोश्री बाहेर ठिय्या देणार आहे.अशी भुमिका मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे.सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या काळात फक्त मराठा समाजाची मते घेऊन त्यांचा राजकीय स्वार्थापोटी वापर फक्त केला जातो.फक्त उध्दव ठाकरे यांच्याच घराबाहेर नाही तर जेष्ठ नेते शरद पवार व अजित पवार.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांच्या निवासस्थानी देखील मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून त्यांची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.असे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सांगण्यात आले आहे.