पुणे दिनांक १ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केरळमध्ये वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत मृतांचा आकडा हा २५६ वर पोहोचला आहे.तर यात अजूनपर्यंत २४८जण हे बेपत्ता आहेत.अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान यात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तसेच घटनास्थळावर रेस्क्यू टीमचे ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे.पण या ऑपरेशन मध्ये मुसाळधार पाऊसाने व खराब हवामानामुळे मदतकार्यस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे.दरम्यान या भूस्खलनात चार गावे मातीच्या ढिगा-या खाली दबली गेली आहे.यात काही रस्ते व पूलही वाहून गेले आहेत.
दरम्यान आज लोकसभेतील काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे वायनाड येथे पोहोचले असून यात ते आज वायनाड येथे झालेल्या भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.