पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या कोरबा-विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या तीन एसी डब्यांना आग लागली आहे.दरम्यान सदरच्या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी यांच्या कडून तातडीने ही आग आटोक्यात आणली आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकरची जीवीत हानी झालेली नाही.या एसी घ्या बोगीत प्रवासी नव्हते.आग आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते.त्यामुळे रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या मुळे रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती. सदर घटना नंतर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.