पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नाशिक मध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच शिवरे.करंजी.निफाड.व दिंडोरीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.तसेच गोदापात्रातील काही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच गोदावरी नदीच्या काठावरील काही दुकाने महसूल प्रशासनाच्या वतीने हालविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.