पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे.अहमदनगर.सोलापूर व धाराशिव अशा एकूण ४ जिल्ह्यात सिंचन व जिल्ह्यांची तहान भागवणारे उजनी धरण आता जवळपास ९० टक्के भरले आहे.उजनी क्षेत्राच्या वरील बाजूस असलेल्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.तसेच पुण्यातील बंडगार्डन बंधारा व भीमा नदीच्या पात्रातून १ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत असल्याने उजनी धरणाच्या जलाशयात सध्याच्या स्थितीत एकूण ९०टक्के पाणी साठा झाला आहे.त्या मुळे पूरनियंत्रनांसाठी उजनी धरणातून एकूण १६ मो-या द्वारे भीमा नदीच्या पात्रात आज रविवारी सायंकाळी पाच वाजता तब्बल २० हजार क्युसेकने पाणी सोडायला सुरुवात झाली आहे.तसेच उजनीच्या धरणातून आवश्यकतेनुसार याच्यात विसर्गात वाढ करण्याची शक्यता आहे.सध्या उजनी धरणात दौंड येथून तब्बल ९५ हजार २०२ क्युसेकने विसर्ग केला जात आहे.आता उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून भीमा नदीच्या काठावरच्या सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.