पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.लोणवळ्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत असून काल शनिवारी २४ तासात जवळपास तब्बल २३५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.व आज देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.तसेच कार्ला गडावर देखील मुसळधार पाऊस कोसळत असल्याने एकविरा देवीच्या गडावर तब्बल कमरेपर्यंत पाणी हे भाविकांना लागले आहे.अशातच भाविक हे एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत होते.लोणवळा परिसरात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसामुळे आता भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.भुशी धरणांच्या सांडव्यावरुन पाणी वेगाने वाहत आहे. पुणे ग्रामीण लोणावळा पोलिसांनी 👮 सुरक्षेसाठी येणाऱ्या पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यासाठी मज्जाव केला आहे.तर नांगरगाव रस्ता हा देखील पाण्याखाली गेला आहे.बोपदेव रोड तसेच नारायणी धाम मंदिरा समोरील रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे.