पुणे दिनांक ७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक झाली असून सदरच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत.अनुसुचित जाती जमातीच्या जात.वैधता प्रमाण पत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आता दूर होणार अधिनियमात सुधार करण्याच्या निर्णय.तसेच विना परवानगी 🌲 झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र लाॅजिस्टिक धोरण राबविणार.यातून पाच वर्षांत ३० कोटींचे उत्पन्न मिळणार.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय उभारण्यात येणार.तसेच आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
दरम्यान दिनांक ९ ऑगस्टपासून हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. यात अडीच कोटी घरांवर तिरंगा ध्वज फडकविणार. तसेच विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या कुकडेश्र्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.तसेच सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट देण्यात आली आहे.