पुणे दिनांक ९ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार शिवनेरी गडावर पुष्पहार अर्पण करुन खाली उतरत असताना क्रेनमध्ये अचानकपणे बिघाड झाल्याने क्रेन मध्यभागी आल्यावर ती तुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे हे खाली पडताना थोडक्यात बचावले आहेत.दरम्यान ही घटना घडल्या नंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज शिवनेरी गडावरुन सुरुवात झाली आहे.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी जयंत पाटील अमोल कोल्हे व रक्षा खडसे.आणी मेहबूब शेख हे क्रेनमध्ये चढले होते. दरम्यान पुष्पहार घालून हे सर्वजण क्रेन मधून खाली येत असताना अचानकपणे या क्रेनमध्ये बिघाड झाला. ती मध्यभागी आली असताना ती तुटली व या दुर्घटनेत जयंत पाटील व अमोल कोल्हे व अन्य जण खाली पडताना थोडक्यात बचावले आहेत.सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची कुणाला देखील दुखापत झाली नाही.दरम्यान थोड्यावेळ उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली होती.