पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी पुण्यात शांतता रॅली होत असून.दुपारी १२ वाजता सारसबाग येथून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे.या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल केले आहेत.जरांगे पाटील यांची शांतता रॅली ही टिळक रस्त्यावरील पूरमचौक.बाजीराव रस्ता.शनिपार.अप्पा बळवंत चौक.शनिवार वाडा.गाडीतळ पुतळा.छत्रपती शिवाजी महाराज पूल मार्गे जाणर आहे.
दरम्यान पुढे ही रॅली एसएसपीएमएस .स.गो.बर्वे चौक माॅर्डन कॅफे.जंगली महाराज रस्ता.झाशीची राणी चौक जंगली महाराज रस्ता मार्गे डेक्कन जिमखाना भागात पोहोचणार आहे.छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे रॅलीची सांगता होणार आहे.त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत.तरी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.असं आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान सिंहगड रोड वरुन येणारी वाहतूक दांडेकर पूल.सावरकर चौक.मित्रमंडळ चौक व व्होल्गा चौक.या प्रमाणे वळविण्यात आली आहे.तर एसपी कॉलेज चौकातून पूरम चौकाकडे जाणारी वाहतूक ही बंद राहणार आहे.तसेच जेधे चौकाकडे जाणारा रस्ता देखील वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.जरांगे पाटील यांची रॅली निघाल्य नंतर वाहतूकीत हे बदल असणार आहेत.कुमठेकर रोड वरुन शनिपारकडे जाणारी वाहतूक बंद राहील.व लक्ष्मी रोडवरुन बेलबाग चौकाकडे जाणारी वाहतूक व्यवस्था बंद राहील.तसेच अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.मंगला टाॅकीज प्रिमिअर गॅरेजकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.व शिवाजी नगर न्यायालयाकडून येणारी वाहतूक बंद राहणार आहे.तसेच शांतता रॅली ही जंगली महाराज रोडवर आल्यावर हे रस्ते बंद राहणार आहेत.केळकर रोड वरील वाहतूक बंद राहणार आहे.भिडे पूल पुलाची वाडी येथून जंगली महाराज रोडवरील वाहतूक बंद राहणार आहे.तसेच खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.दरम्यान सदरची शांतता रॅली पुढे जाईल तसतसी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येईल अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.