Home Breaking News शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या पुतण्यावर अज्ञात व्यक्ती कडून गोळीबार

शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या पुतण्यावर अज्ञात व्यक्ती कडून गोळीबार

143
0

पुणे दिनांक ११ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे कार्यकर्ते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील यांच्यावर कवठेमहांकाळ येथील मोबाईल शाॅपीच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पिस्तूल मधून गोळीबार केला आहे.पण सदरची गोळी ही पिस्तूल मध्येच लाॅक झाल्याने अभिजित पाटील हे वाचले आहेत.दरम्यान गोळीबार नंतर अज्ञात हल्लेखोर हे पळून गेले आहेत.सदरच्या गोळीबाराची घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा 📷 मध्ये कैद झालेली आहे.दरम्यान या गोळीबार प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज हे ताब्यात घेतले असून या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून.या प्ररकणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Previous articleराज्यातील एकूण ५००उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदी बढती – रश्मि शुक्ला यांनी काढले आदेश
Next articleमराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी कुर्डुवाडीत अडवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here