Home Breaking News राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता

राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता

103
0

पुणे दिनांक १३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राज्यातील विधानसभांच्या निवडणूका ह्या दिवाळी नंतर दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान दिवाळी ही ऑक्टोबर च्या महिना अखेरीस सुरू होत असून ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात समाप्त होत आहे.दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूका ह्या ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती मात्र ही निवडणूक आता दिवाळी नंतरच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान नियमानुसार २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन विधान सभा अस्तित्वात येणार आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता व आणि प्रचाराचा धुरळा का ? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे.त्यामुळे दिवाळी नंतरच राज्यातील विधानसभांच्या निवडणूका चार विचार निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे.दरम्यान राज्यातील विधानसभांच्या निवडणूका ह्या ठरलेल्या वेळेतच व्हावे सरकारच्या धोरणानुसार नको असे उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Previous articleमंत्री छगन भुजबळांच्या निवास व कार्यालयाची सुरक्षा वाढवली
Next articleआजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे मोठे निर्णय,नगर‌अध्यक्षाचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here