पुणे दिनांक १४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये २०२४ स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरविण्यात आले होते.अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने ऑलिम्पिक समितीने तिच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे तिला सुवर्णपदकचा सामनाही खेळता आला नाही यामुळे तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.आणि किमान संयुक्त रौप्यपदक दिले जावे अशी विनंती केली होती.ही याचीका आज फेटाळण्यात आली आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान या बाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.मात्र अनेकजणांनी सोशल मीडियावर अपडेट्स शेअर केले आहे.
दरम्यान या याचिकेवर मागील आठवड्यात सुनावणी झाली होती.पण १६ ऑगस्टपर्यंत निकाल लांबणीवर टाकण्यात आला होता.पण आज बुधवार दिनांक १४ ऑगस्टला आलेल्या निर्णयानुसार आता तिची याचिका फेटाळण्यात आली आहे.यामुळे तिला आता रौप्यपदकाला देखील मुकावे लागणार आहे.तसेच या निर्णयामुळे आता भारताला मोठा धक्का बसला आहे.