पुणे दिनांक १७ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार व प्राथमिक माहिती नुसार उत्तर प्रदेश मधील कानपूर जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास रेल्वे अपघात झाला आहे. कानपूर ते भीमसेन रेल्वे स्टेशन दरम्यान सदरचा अपघात झाला असून या अपघातात साबरमती रेल्वे एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून घसरले आहेत.या अपघातात कोणत्याही प्रकारची प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली नाही.
दरम्यान या रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार धावत्या साबरमती रेल्वे एक्स्प्रेसवर दगड रेल्वे ट्रॅकवर असल्याने ते इंजिनवर आदळल्याचे रेल्वेचा पायलट सांगत आहे.इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.अशी माहिती मिळत आहे.