पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोलकात्यात मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर क्रूरता आणि हत्या करण्यात आली होती.याचे पडसाद संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत.त्या मुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक नागरिक हे कोलकात्यात रस्त्यावर उतरले आहेत.त्यामुळे आता या हत्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यास बंदी घातली आहे.पुढील सात दिवसांसाठी संपूर्ण कोलकाता शहरात कलम १६३ व पूर्वी लागू करण्यात आलेले १४४ कलम रहाणार आहे.त्यामुळे आता राजी मेडिकल कॉलेज समोर निदर्शने करता येणार नाही. तसेच हिंसक निदर्शने.रॅली आणि सभाद्वारे शांतता भंग पावू शकते.असे पोलिसांचे म्हणणे आहे.मात्र कोलकाता शहरात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची क्रुरता आणि हत्या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांच्या चांगल्याच निशाण्यावर आल्या आहेत.आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून तपास योग्य दिशेने सुरू आहे.