पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विश्रांतीनंतर राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडाक्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.पुण्यात शहर व उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.धायरी न-हे वडगाव व तसेच शहरातील अनेक भागात पाऊस कोसळत आहे. त्याच बरोबर संभाजीनगर भागात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.दरम्यान आयएमडी कुलाबा वेधशाळेच्या वतीने संभाजीनगर भागात पुढील तीन तासात मुसाळधार पाऊस कोसळणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.तसेच या भागाला रेड अलर्ट घोषित केला आहे.तसेच या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.दरम्यान मागील एक तासांहून अधीक वेळ पुण्यात पाऊस कोसळत आहे.त्या मुळे आज रविवार व सुट्टी असल्याने अनेकजण राखी खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते त्यांना या पावसाचा फटका बसला आहे.व त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.तसेच अचानकपणे आलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.तसेच पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९७ टक्के पाणी साठा झालेला आहे.पुण्यात मुसळधार पावसामुळे नागझरी ओढ्याला पूर आला आहे.