पुणे दिनांक २३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.दरम्यान यावर आता एक मोठी अपडेट हाती येत आहे.मुंबई उच्च न्यायालयात काही वकील यांच्यासह काहींनी याचिका दाखल केली आहे.दरम्यान आता या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यात येत आहे.आज दुपारपर्यंत यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. सदरची सुनावणी ही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायाधीश अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान उद्याच्या महाराष्ट्र बंदमुळे अनेक गोष्टी बंद राहणार आहे.या बंदचा सार्वजनिक सेवांवर परिणाम होणार आहे.असे याचिका कर्ते यांनी न्यायालयात सांगितले आहे.त्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यात येत आहे.यावर आज न्यायालयात महाधिवक्ता डॉ.बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात सांगितले की.२४ ऑगस्टचा बंद हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे.कुणालाही अशाप्रकारे बंद पुकारता येणार नाही.तसा त्यांना अधिकार नाही.बंद करणाऱ्या वर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.तसेच बंद मध्ये सहभागी होणाऱ्यावर देखील कारवाई केली जाईल असे त्यांनी असे त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्ट केले आहे.याबाबत कायदा स्पष्ट आहे.सर्वोच्च न्यायालयाने या पूर्वीच निर्देश दिले आहेत.तर आमच्या हस्तक्षेपाची गरज काय?जर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे तर यात न्यायालयाला का खेचताय?असा सवाल मुख्य न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केला आहे.आज दुपारीच या प्रकरणावर अडीच वाजेपर्यंत निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे की महाविकास आघाडीचा उद्याचा बंद बेकायदेशीर आहे.शरद पवार व उद्धव ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत.त्यांना अटक करावी लागेल.अशी मागणीच वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.दरम्यान या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरविले आहे.असे देखील सदावर्ते यांनी म्हटले आहे.