पुणे दिनांक २४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूराती एका खासगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थ आज शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तोंडाला काळ्या फिती लावून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनला सुरुवात झाली आहे.आज सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार हे तोंडाला काळा मास्क लावून तेथील पाय-यावर आंदोलनला बसले आहेत.दरम्यान त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित आहेत.तर काॅग्रेस पक्षाचे व शिवसेनेचे पदाधिकारी हे सर्वजण याठिकाणी तोंडाला काळी फिती बांधून आंदोलनात सहभागी झाले आहेत.