पुणे दिनांक २६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार संभाजीनगर येथे रामा हाॅटेल समोर उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून एकामेकाला धक्काबुक्की केली आहे. तसेच मारहाण केली व चप्पल फेकण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलिस सरकारची चाकोरी करत असल्याचा आरोप यावेळी केला आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत ते रामा हाॅटेल मध्ये मुक्कामी होते.आज सकाळी भाजपचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते.त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर तिथे आले यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले व त्यांच्यात हाणा मारी झाली यावेळी पोलिसांनी 👮 सौम्य असा लाठीचार्ज केला आहे.आता परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे.तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी प्रथम जबाब द्यावा व नंतरच महिला अत्याचारा बदल बोलावे असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.यावरुन दोन्ही गटात वाद झाला आहे.दरम्यान या प्रकरणी शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिस हे सरकारची चाकोरी करत आहेत.असे यावेळी म्हणाले आहेत.