पुणे दिनांक २८ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिंधुदुर्ग मधून एक मोठी अपडेट हाती येत असून मालवण येथील राजकीय किल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आज मालवण बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.या बंद मध्ये सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी होणार आहे.दरम्यान या बंद मध्ये व्यापारी वर्ग देखील दुकाने बंद ठेऊन बंदला पाठिंबा देणार आहे.आज महाविकास आघाडीच्या वतीने जनसंताप मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.सदरच्या मोर्चात आदित्य ठाकरे.जयंत पाटील.विजय वडेट्टीवार.तसेच अंबादास दानवे.सहभागी होणार आहे.तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी होणार आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी मध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.व घटनेचा निषेध म्हणून आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान राजकोट किल्ल्यावर मागील आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं त्यानंतर हा पुतळा कोसळला हा पुतळा शिल्पकार जयदीप आपटे यांनी बनवला होता. दरम्यान हा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत महायुती सरकारला चांगलेच घेरले आहे.व आज जनसंताप मोर्चा देखील काढणार आहे.