पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई मधील मीरा भाईंदर येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची अपडेट हाती आली आहे.दरम्यान या हल्ल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.सदरच्या हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव राजन पांडे हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांच्यावर हल्लेखोराने पोटावर व मानेवर चाकूच्या सहाय्याने हल्ला केला आहे.त्यांना उपचारासाठी तातडीने मीरारोड येथील वाॅकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीत ही घटना घडली आहे.दरम्यान राजन पांडे यांना भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते रवी व्यास यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात आहे.दरम्यान प्राथमिक माहिती नुसार विनोद राजभर यांने राजन पांडे यांच्यावर हल्ला केला अशी माहिती मिळत आहे.