पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवार १ सप्टेंबर महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी या दुर्घटनेचा निषेधार्थ जोडेमारो आंदोलन करणार आहे.दरम्यान या आंदोलनात आज शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे शिवसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व कार्यकर्ते तसेच काॅग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.आज ११ वाजता मुंबईतील हुतात्मा चौकातील पुतळ्याला वंदन करून गेट-वे ऑफ इंडिया प्रर्यत आंदोलन करणार आहेत.या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे नेते उध्दव ठाकरे तसेच काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आमदार व नगरसेवक तसेच नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.दरम्यान या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नाही .तरी महाविकास आघाडीच्या वतीने आज जोडेमारो आंदोलन करणार आहेत.