Home Breaking News वनराज आंदेकर केएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

वनराज आंदेकर केएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

508
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील नाना पेठेतील डोके तालीम येथे थांबले असता अज्ञात हल्लेखोरांनी वनराज आंदेकर यांच्यावर रिव्हालवर मधून पाच गोळ्या घातल्या व तसेच त्यांच्यावर कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करून त्यांना गंभीर रित्या जखमी करून हल्लेखोर हे फरार झाले आहेत.जखमी वनराज आंदेकर यांना तातडीने उपचारासाठी केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान उपचार सुरू असतानाच आता त्यांचा मृत्यू झाला आहे.वनराज आंदेकर हे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते.दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर आता पुण्यात एकच खळबळ उडाली असून  आता पोलिसांनी 👮 नाना पेठेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Previous articleपुण्यात वनराज आंदेकरवर गोळीबार व कोयत्याने हल्ला
Next articleआज सोमवती अमावास्या जेजुरीत खंडेबारायाची यात्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here