पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक विचित्र घटना उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा या ठिकाणी घडली आताच्या काळात माॅर्डन जमाना असताना देखील एक विचित्र अशी घटना घडली आहे.पतीला पत्नीच्या बहिणी बरोबर नाचणं खूपच महागात पडले आहे.पती आपल्या बहिणी बरोबर नाचलं म्हणून पत्नी चांगलीच तापली.व तिने चक्क आपल्या पतीला सर्व नातेवाईकां समोर चप्पलने त्याची धुलाई केली.
दरम्यान या घटने प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.उत्तर प्रदेश येथील आग्रा या ठिकाणी विवाह सोहळा होता.आता विवाह सोहळा म्हणले की नाच गाणे आलेच .यात या विवाह सोहळ्यात पत्नीची बहिण ही अन्य नातेवाईकांबरोबर नाचत होती.तीला पाहूण मेव्हण्याच्या देखील नाचायचा मूड झाला व तो मेव्हणी बरोबर नाचू लागला .हे त्यांच्या पत्नीला चांगलेच खटकले.व तिची चांगलीच सटाकली व तिने सर्व नातेवाईकां समोरच पतीला चक्क चप्पलच्या सहाय्याने धुतले.दरम्यान ही घटना पार दोघांच्या घटस्फोटा पर्यंत पोहोचली.