पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते गोवा महामार्गावर आता अवचड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.तसा निर्णयच राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. दरम्यान दिनांक ५ सप्टेंबरपासून ८ सप्टेंबरपर्यंत मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांचा प्रवास बंद राहणार आहे.तर परतीच्या प्रवासासाठी दिनांक ११ सप्टेंबर पासून १३ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना वाहतूक बंद असणार आहे.मात्र आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.