पुणे दिनांक ४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याण येथील घरामधून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 त्याच्या आज रात्रीच्या वेळी मुसक्या आवळल्या आहेत.तो गुन्हा दाखल झाल्यापासून मागील दोन आठवड्यापासून फरार होता.तो आज त्याच्या कल्याण येथील घरी कुटूंबातील लोकांना भेटण्यासाठी आला होता.त्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.कालच सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.त्याच्या मागे कल्याण.ठाणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिसांच्या एकूण सात टीम त्याचा शोध घेत होत्या.अखेर त्याला आज पोलिसांनी अटक केली.आता पुढील तपासा करीता मालवण येथे पोलिस घेऊन जाणार आहेत.दरम्यान दिनांक २६ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या नंतर शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.तेव्हा पासून आपटे हा फरार झाला होता.दरम्यान तो फरार झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर चांगलीच टीका केली होती.