Home Breaking News खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला,बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला,बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला

108
0

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे धरणे ओंसडून वाहत आहेत.सर्वच धरणे आता भरली आहेत.त्यामुळे खडकवासला धरणातून रात्री मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्यामुळे डेक्कन येथील नदीच्या पात्रात असलेला बाबा भिडे पूल हा पाण्याखाली गेले आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बंद केली आहे.दरम्यान काही प्रमाणावर पूलावरील पाणी हे ओसरले आहे तरी बाबा भिडे पूलावरील बॅरीकेंटीग हे वाहतूक पोलीसांनी लावून ठेवले आहे. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून १६ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते.

Previous articleआज सकाळी साडेसहा वाजता कमला मिल परिसरातील टाइम्स टाॅवरला भीषण आग 🔥 धुराचे लोटने परिसर व्यापला
Next article‘ सुसंस्कृत महाराष्ट्राची संपूर्ण वाट लावली मिंधे-भाजपाने’-आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here