पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन एसटी बस समोरा समोर धडकल्या आहेत.सदरचा अपघात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.यात एकूण २५ प्रवासी हे जखमी झाले आहेत.दरम्याश मुंबई ते गोवा महामार्गावर नागोठणे जवळ सदरचा अपघात झाला आहे.दरम्यान अनेक चाकरमानी हे मुंबई वरून गणपती साठी गावी जात असताना वाहतूक कोंडी व त्यांच्यावर अपघाताचे विघ्न समोर आले आहे.दरम्यान मुंबई वरून राजापूर कडे जाणा-या एसटी बसला दुसऱ्या एसटी बसने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.यात दोन्ही एसटी बसचे नुकसान झाले आहे.
आज शनिवार दिनांक ७ सप्टेंबर व आजपासून राज्या मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.मुंबई वरुन मोठ्या प्रमाणावर चाकरमानी हे कोकणात गावी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जात असतात पण नेहमीच या महामार्गावरील रोडची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर दुरूस्ता झाली आहे.त्यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांग लागून वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजल्यात खड्ड्यांमुळे प्रवाशांना यावेळी मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरं जावं लागत आहे.त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे या महामार्गाला अजून दोन वर्षे लागतील असे बेजबाबदार सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी कालच अक्कलेचे तारे मोजले आहेत .व हा महामार्ग तयार होण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील असं सांगितलं आहे.महायुती सरकारचा फटका हा मुंबई वरून कोकणात गावी गणपती बाप्पा साठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील चाकरमान्यांचे प्रचंड प्रमाणावर हाल होत आहेत.वाहतूक कोंडीची समस्या त्यांच्या समोर यावर्षी देखील आहे.व खड्ड्यांमुळे अपघात असा दुहेरी फटका प्रवाशांना बसला आहे.दरम्यान मुंबई वरून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकूण १ हजार ५०० बस सोडण्यात आल्या आहेत.७ ते ८ किलो मीटर प्रर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
ज्ञ