पुणे दिनांक ९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे पोलिसांना एक मोठा हत्या-यांचा जकिराच सापडला आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.यात पोलिसांनी एकूण सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही पुणे ग्रामीण पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान गणपती उत्सवाच्या काळातच हा मोठा हत्या-यांचा जकिरा सापडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी पुणे ग्रामीण 👮 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस चौकीच्या हद्दीत ९ सुताळी बाॅम्ब तसेच ३ पिस्तूल व २ तलवारी असा खूप मोठा शस्त्रसाठा मिळाला आहे.सदरचा शस्त्रसाठा पोलिसांनी 👮 जप्त केला आहे.व एकूण ६ जणांच्या यात मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान गणेशोत्सवा च्या काळातच हा शस्त्रसाठा सापडल्याने वालचंदनगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आता या आरोपींकडून चौकशी करत आहेत.