Home Breaking News बदलापूर नंतर कर्जत हादरले महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना, पोलिसांनी 👮 आवळल्या ७...

बदलापूर नंतर कर्जत हादरले महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना, पोलिसांनी 👮 आवळल्या ७ जणांच्या मुसक्या

123
0

पुणे दिनांक १० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.बदलापूर नंतर आता कर्जत हादरले आहे.दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान अत्याचारग्रस्त महिलेला धमकावून ७ जणांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे.संबंधित घटनेनंतर कर्जत मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तातडीने एकूण ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.यातील सर्व आरोपी हे ठाकूर वाडी येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यातील सर्व आरोपींनी पीडित महिला बरोबर ओळख वाढवली.व हळूहळू तिचा विश्र्वास संपादन केला.त्यानंतर यातील आरोपींनी पीडित महिलेचे मोबाईलवर आक्षेपार्ह छायाचित्र मागवलं त्या नंतर पीडित महिलेने हे फोटो पाठवले.त्यानंतर आरोपी यांनी तिचे फोटो सोशल मीडियावर टाकेल अशी धमकी दिली.व तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले  व त्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. दरम्यान त्यानंतर यातील सहा आरोपींनी देखील पीडित महिलेला फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी दिली.व तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला.अशा स्वरूपाची पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून.पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड या प्रकरणी तपास करीत आहेत.

Previous articleवंदे भारत एक्स्प्रेस बंद पडली, चक्क मालगाडीच्या इंजिन लावून खेचली वंदेभारत ट्रेन व्हिडिओ तुफान व्हायरल
Next articleआज भक्तीमय वातावरणात गौरीचे घरोघरी आगमन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here