Home Breaking News कुंजीरवाडी थेऊरफाट्याजवळ पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या सहा जणांच्या पोलिसांनी 👮 आवळल्या...

कुंजीरवाडी थेऊरफाट्याजवळ पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या सहा जणांच्या पोलिसांनी 👮 आवळल्या मुसक्या,४८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

107
0

पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती येथे असणां-या  एच पी सीएल.ओसीएल येथून टॅंकर मध्ये डिझेल व पेट्रोल भरून सदरचे पेट्रोल व डिझेल चोरी करण्याच्या उद्देशा ने.सदर टॅंकर पेट्रोल पंपावर न नेता मौजे कुंजीरवाडी येथील फाट्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये पेट्रोल चोरी करताना पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत व एकूण सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.व एकूण १ हजार ६२० लिटर डिझेल एकूण असा ४८ लाख १ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई मुंढवा व लोणी काळभोर पोलिसांनी 👮 केली आहे.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या सहा जणांच्या टोळीची नावे १) शुभम सुशील भगत ( वय २३ रा.बोरकर वस्ती थेऊरफाटा ता.हवेली जि.पुणे.२) तुषांत राजेंद्र सुंभे ( वय ३१ रा.बॅंक ऑफ बडोदा जवळ थेऊर फाटा या.हवेली जि.पुणे ) ३) रवी केवट  ( वय २० रा.बोरकर वस्ती माळीमाळा ता.हवेली जि.पुणे) ४) विशाल सुरेश गोसावी ( वय ३० रा वाणी मळा थेऊर फाटा ता.हवेली जि.पुणे ) ५) किरण हरीभाऊ आंबेकर (वय ३१ रा.कदमवाक वस्ती ता.हवेली जि.पुणे) ६) रोहित कुमार ( वय २१ रा. बोरकर वस्ती माळीमळा ता.हवेली जि.पुणे ) असे आहेत.दरम्यान या प्रकरणी पोलिसांना या बाबत खब-या मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापेमारी करून ही कारवाई केली आहे. दरम्यान सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील व पोलिस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे शहर आर .राजा पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहा पोलिस आयुक्त पुणे शहर अश्र्विनी राख.वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट व सह पोलिस निरीक्षक राजु महानोर.पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके. पोलिस अंमलदार रामहरी वणवे.तसेच मंगेश नानापुरे . मल्हार ढमढेरे.शिवाजी जाधव.संदीप धुमाळ.बाजीराव वीर.योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या बाॅडीगार्डची भररस्त्यात कारचालकाला मारहाण
Next articleशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here