पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या गुरुवारी दिनांक १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यामुळे आता विधानसभापूर्वी काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यात आले नाही.दरम्यान सभापती नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून सुनील प्रभू तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.दरम्यान या याचिकांवर उद्या गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी सुचिबध्द करण्यात आली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून या याचिकांवर फक्त तारीख पे तारीख असंच चालू आहे.तसेच विधान सभा सभापती राहुल नार्वेकर यांना शपथपत्र न्यायालयात दाखल करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.त्यामुळे या याचिकांवर सुनावणीच्या कामाला वेग आला होता.त्यामुळे उद्या या प्रकरणी न्यायालयाकडून काय निर्णय येतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचे असणार आहे.दरम्यान येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी या बाबत निर्णय येणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणावर व पक्ष हे ठरविण्याचा अधिकार सभापती राहुल नार्वेकर यांना दिला होता.दरम्यान त्या नंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेच आमदार अपात्र केले नाहीत.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.