Home Breaking News गणेश विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करणार...

गणेश विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार

152
0

पुणे दिनांक १६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या मंगळवारी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या मोठ्या भिंती उभारून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.त्यासाठी खास पोलिस यांच्या वतीने ध्वनी पातळी तपासण्यासाठी ( नाॅईज लेवल मीटर) व एकूण १२६ पथके तैनात करण्यात आले आहे.हे पथके गणेश मंडळांच्या साऊंड सिस्टीम वर लक्ष ठेवतील अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत काही मंडळाकडून साऊंड सिस्टीमच्या भिंती उभारल्या जातात.त्याचा त्रास लहान मुले.तसेच रुग्ण.वयोवृध्द नागरिक यांना होतो.याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीत कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी पातळी बाबत देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करु नये.ज्या मंडळाकडून नियमांचे उल्लंघन करणात येईल.त्या मंडाळावर कारवाई करण्यासाठी एकूण १२६ पथके तयार करण्यात आली आहे.याची सर्व मंडळींनी नोंद घ्यावी.अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.दरम्यान पुणे शहरात गणेशोत्सव उत्साहात व चांगल्या वातावरणात सुरू आहे.तसेच सर्व गणेश मंडळांच्या वतीने चांगले सहकार्य मिळत आहे.दरम्यान पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.तसेच विसर्जन मिरवणूक सोहळा चांगल्या वातावरणात पार पडेल असा विश्वास पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

 

Previous articleपंढरपुरात उपोषणस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न एकच खळबळ
Next articleमध्यरात्रीपासून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहाव्यांदा उपोषण सुरु, उपोषणाचं हत्यार उपसल्याने महायुती सरकारची होणार कोंडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here