पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलननामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला सोमवारी रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने दारुच्या नशेत धडक दिली आहे.दरम्यान सदर च्या अपघातात चंद्रकांत पाटील हे थोडक्यात बचावले आहे.त्यांना या अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सोमवारी उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते.त्यावेळी मद्यधुंद वाहन चालकांने त्यांच्या गाडील जोरदार धडक दिली आहे.या अपघातात मंत्री चंद्रकांत पाटील हे थोडक्यात बचावले आहेत.परंतू त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पोलिसांनी दारुच्या नशेत धुंद असलेल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.