पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आज गुरुवारी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान यापूर्वीच त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती.तसे ते इच्छुक होते.आज त्यांनी आता काॅग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान संजय पांडे हे विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण यावर काॅग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील असे त्यांनी काॅग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.